पंखात नाद अपुल्या

🗓️ दि. १५ – १८ मे २०२६ 📍 स्थळ: मोझरी, सांजाग्राम

💰 प्रवेश देणगी शुल्क: ₹१,००० किंवा त्याहून अधिक (आपली क्षमता व इच्छेनुसार)

आणि ज्यांना शुल्क भरणे अजिबात शक्य नाही, त्यांनी निसंकोच संपर्क करावा, काहीतरी मार्ग नक्की काढू! ✨


प्रिय सखी, 🌸

ही साद तुला, तुझ्यातील स्त्रीत्वाला…
घर आणि जबाबदाऱ्यांच्या धावपळीत खूप मागे पडलेल्या तुझ्या अस्तित्वाला! 🌿
आम्ही चारचौघी, तुझ्यासारख्याच… आपल्याच आत असलेला आनंदाचा झरा धुंडाळणाऱ्या…
आत्मसन्मानाचे बोट पकडण्यासाठी धडपडणाऱ्या… तुझ्या मैत्रिणी! 🤝
आम्ही एकत्र येत आहोत. तूही यावेस म्हणून हे निमंत्रण!
हा आसमंत तुझा आहे, तुझ्या पंखांसाठी…
हे शिबीर तुझेच आहे, तुझ्या आनंदासाठी! 🕊️

✨ ही मनमोकळ्या अभिव्यक्तीची सुरक्षित जागा
✨ हा तुला तुझ्याशी जोडणारा हळवा धागा
✨ ही बाग भावनांच्या फुलांनी बहरणारी
✨ इथली सोबत आयुष्यभर आनंद देणारी
✨ एक ‘नॉन-जजमेंटल स्पेस’ तुला तुझ्याच पुढ्यात उलगडणारी!
✨ आनंददायी व अर्थपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन…
✨ तणाव, नातेसंबंध आणि नवी झेप घेण्यासाठी समुपदेशन
✨ खेळ, गप्पा, गीत, संगीत…
✨ आदर, प्रेम, आनंद अगणित!

अशा अनुभवसुंदर शिबिराचे हे आग्रहाचे निमंत्रण! 💌


नोंदणीसाठी निसंकोच संपर्क साधा:
📞 मानसी: +91 70581 52602
📞 अमृता: +91 95299 27461
📞 तनया: +91 90960 75166

नाव(Required)
वैवाहिक स्थिती(Required)
आपण काय करता?(Required)
प्रिय,

तुम्ही किती देणगी देऊ इच्छिता? *

या शिबिराचे संपूर्ण शुल्क ₹५,००० आहे. 💸

ज्यांना पूर्ण शुल्क भरणे शक्य नाही, त्यांनी किमान ₹१,००० भरावेत. 🤝

आणि ज्यांना हे देखील शक्य नाही — त्यांनी अजिबात काळजी करू नये. फक्त आमच्या टीमशी संपर्क साधा, आम्ही नक्की मार्ग काढू. ✨

Price: ₹ 0.00